नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२१ साठी टेरिफ दर कोट्याअंतर्गत (टीआरक्यू) अमेरिकेला ३०३ मेट्रिक टन कच्ची साखर निर्यात करण्यास अनुमती दिली आहे. विदेशी व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार विदेशी व्यापार धोरण २०१५-२०२० च्या २.०४ धोरणानुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करताना विदेशी व्यापार महासंचालकांद्वारे अमेरिकेला टेरीफ कोट्याअंतर्गत निर्यातीसाठी ३०३ मेट्रिक टन कच्ची साखर अतिरिक्त स्वरुपात पाठविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२१ म्हणजेच १ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी ही मंजुरी आहे. यापूर्वी भारत सरकारने टीआरक्यूअंतर्गत अमेरिकेला ८४२४ टन साखर निर्यातीस अनुमती दिली होती.
टीआरक्यू निर्यात हा नेहमीपेक्षा कमी टेरिफ आकारून अमेरिकेत माल पाठवला जातो. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त आयातीवर उच्च टेरिफची आकारणी होते.