महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २३ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात एकूण १५१ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये ७४ सहकारी तर ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. एकूण १६२.०६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर एकूण १४५.१८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा ८.९६ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सोलापूर विभागात ३५ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाकडी आकडेवारीनुसार २३ नोव्हेंबरअखेर सोलापूर विभागात ३५.७७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर २९.४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. येथे साखर उतारा ८.२४ टक्के आहे.
कोल्हापूर विभागात साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. या विभागात राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत ४४.९० लाख टन ऊसाचे गाळप झाले असून ४५.३९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.