आंध्र प्रदेश : कारखान्यातील साखरेच्या साठ्याचा लिलाव

विजयनगरम, आंध्र प्रदेश : एनसीएस शुगर्सला ऊस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकबाकी मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे. कारण, सरकारने साखरेच्या साठ्याचा लिलाव केला आहे. आगामी काही दिवसात सरकार कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे.

याबाबत Thehansindia.com मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सीतानगरम येथील लच्छैयापेटा गावातील एनसीएस शुगर्स मार्च २०२१ मध्ये बंद झाली आहे. त्यांच्याकडे ईपीएफ, जीएसटी, उत्पादन शुल्क आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, शेतकऱ्यांना वर्ष २०१९-२०, २०२०-२१ मधील ऊसाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. कारखाना बंद झाल्याने शेतकरी आपल्या अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे करत होते. या अडचणी सोडवताना मंत्री मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, कारखान्याची मालमत्ता आणि साखरेच्या साठ्याची विक्री करून त्यांची देणी भागवली जातील. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कारखान्याची १९.९० एकर जमीन आणि साखर साठा, मालमत्ता जप्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here