महाराष्ट्रातील वृद्धाश्रमात ‘कोविड ब्लास्ट’, ६७ जण कोरोना पॉझिटिव्ह

भिवंडी : महाराष्ट्रातील एका वृद्धाश्रमात राहणारे ६७ जण कोरोना संक्रमित असल्याचे आढळले आहे. सर्व कोरोना संक्रमितांना दवाखान्यात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना संक्रमित आढळलेल्या ६७ जणांमध्ये ५ कर्मचारी आहेत. तर उर्वरीत ६२ जण साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत. सर्वांना ठाणे जिल्ह्यातील एक सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. वृद्धाश्रमात एवढे रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.
वृद्धाश्रमात राहणारी एक व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढलली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने भिवंडीतील सोरगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात तपासणी केली. येथे १०९ जण राहतात. त्यातील बहूतांश पॉझिटिव्ह आढळले. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. दरम्यान, या वृद्धाश्रमातील ६२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here