ट्रान्सपोर्टर्सच्या मनमानीविरुद्ध संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

गोंडा : धानेपूर ऊस खरेदी केंद्रातील गैर व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकरी वैतागले आहेत. ट्रॉली आणि कामगार नसल्याने दिवसभर उसाचे वजनच झाले नाही. शेतकरी आणि साखर कारखान्याचे अधिकारी खरेदी केंद्रातून वाहतूकदारांना फोनवर संपर्क साधत राहीले. मात्र, वाहतूकदार मोबाइल स्वीच ऑफ करून गायब झाला. वाहतूकदारांच्या मनमानी विरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रावर आंदोलन केले. त्या वाहतूकदाराला केंद्रातून हटवावे अशी मागणी करण्यात आली.

अमर उजाला डॉट कॉममध्ये याबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मनकापूर साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्र धानेपूर एकवर शनिवारीही अशीच स्थिती होती. वाहतूकदार अशोक सिंह मोबाईल स्वीच ऑफ करून गायब झाला होता. कारखान्याचे अधिकारी दिवसभर त्याचा शोध घेत होते. तर शेतकरी आपल्या उसाचे वजन होईल याची प्रतीक्षा करत होते. दुपारनंतर शेतकरी संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजी करत त्या वाहतूकदाराला हटविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळी चार वाजता दुसऱ्या केंद्रातून कामगार व ट्रॉलीची व्यवस्था केली. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच अशी स्थिती असल्याचे शेतकरी रामकृपाल, रमेश कुमार, शिवकुमार व राजेश यांनी सांगितले. अशोक या वाहतूकदाराला येथील कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, गैर व्यवस्थेने सर्वजण वैतागले आहेत. आता शेतकऱ्यांनी सरव्यवस्थापक उमेश सिंह बिसेन यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी वाहतूकदाराविरोधात कारवाईचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here