गोरखपूर : उत्तर प्रदेशात सरकारने केलेल्या विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. सरकार देशभरातील सर्व जिल्ह्यांत किमान एक मेडिकल कॉलेज सुरू करेल असे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधानांनी गोरखपूरमध्ये ९६०० कोटी रुपयांहून अधिक विकास योजनांचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एमएसपीमध्ये अलिकडेच वाढ झाली आहे. योगी सरकारने शेतकऱ्यांना गेल्या साडेचार वर्षात दिलेले ऊसाचे पैसे हे युपीतील गेल्या दहा वर्षांतील सरकारांनी दिलेल्या रकमेपेक्षा अधिक आहेत. आम्ही युरीयाचा दुरुपयोग बंद केल्याचे ते म्हणाले. आम्ही युरियाचे १०० टक्के नीम कोटिंग केले आहे. आम्ही कोट्यवधी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिले आहे. शेतात कोणत्या खताची गरज आहे, हे त्यांना कळाले पाहिजे. आम्ही युरीयाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. अनेक बंद खत युनिट्स पुन्हा सुरू केली आहेत असे पंतप्रधान म्हणाले.