अहमदाबाद: गुजरातमध्ये साखर कारखान्यांनी ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत १.६६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी १.६५ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते, अशी माहिती इंडियन शुगर मील असोसिएशनने (ISMA) दिली.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गुजरात स्टेट फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच्या (GSFCSF) एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उसाचे क्षेत्र यावर्षी अधिक असल्याने चालू हंगामात साखर उत्पादन दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
GSFCSF च्या अंदाजानुसार, २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन वाढून ११.२९ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. २०२०-२१ या हंगामात हे साखर उत्पादन १० लाख टन होते. साखर उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊस उत्पादन वाढल्याने यंदा साखर उत्पादन वाढेल. राज्यात ऊसाचे क्षेत्र २०२१-२२ मध्ये वाढून १.५३ लाख हेक्टर झाले आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र १.२७ लाख हेक्टर होते. साखर कारखान्यांना यंदा १०६ लाख टन ऊस गाळपासाठी मिळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ९८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले होते.