या कारणामुळे झाला ऊस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल  

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

चिलहर सहकारी साखर कारखान्यांच्या चार ऊस निरीक्षकांविरोधात फसवणूक आणि गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पाल, भगवान शरण वर्मा, सतीश चंद्र मिश्रा, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित ऊस निरीक्षकांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून, त्यांची जास्त जमीन असल्याने दाखवून त्याची रितसर नोंद करून घेतली होती. त्याच्या पावत्याही देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर चौघेजण दोषी आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिलहारीचे श्यामाचरण यांची १.५ हेक्टर जमीन असताना सतीश चंद्र मिश्रा यांनी ती ३.१५ हेक्टर ऊस क्षेत्र दाखवून ३.८ हेक्टर उसाची नोंदही केली होती. बरखेडातील शेतकर्याची १.२ हेक्टर जमीन कागदावर ५ हेक्टर दाखवण्यात आली होती. त्यातील ४.९ हेक्टर उसाची नोंद करून त्याच्या खोट्या पावत्याही करण्यात आल्या होत्या. त्याच गावातील उषा देवी यांची १.१ हेक्टर जमीन ४.८ हेक्टर दाखवण्यात आली होती. जोगीपूरमधील मोईन अली, लखोहामधील गंगा सहाय यांच्या नावावर ४.२ हेक्टर जमीन असताना ७.२ हेक्टर ऊस क्षेत्र दाखवण्यात आले होते. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम यांनी या शेतकऱ्यांची ऊस बिले रोखली आहेत.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here