बलरामपूर कारखान्याला १८,००० किलो लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑर्डर

लखनौ : देशभरात विविध ठिकाणांवर १ डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत इथेनॉल पुरवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमसी) जारी केलेल्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्याची माहिती बलरामपूर शुगर मील लिमिटेडने दिली आहे.

http://Indiainfoline.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कंपनीला उत्तर प्रदेशमधील विविध युनिटमसाठी १,३९,१०० किलो लिटरसाठी मंजुरी दिली आहे. याशिवाय बलरामपूर साखर कारखान्याला खासगी क्षेत्रातील ओएमसींना १८,००० किलो लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीला सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील ओएमसींकडून एकूण १,५७,१०० किलो लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here