कारखान्याच्या व्यवस्थापकांविरोधात भाकियुचे आंदोलन

भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरुच ठेवले. किसान सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांची फसवणूक करुन खोट्या तोडणी पावत्या देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आणि युनियनने केला आहे.

ऊस खरेदी केंद्रात बैलगाडीत ११० क्विंटल पेक्षा अधिक ऊस असला तरी त्याचे वजन ११० क्विंटल असेच नोंदवले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बॉंड भरण्यातही घोटाळा झाला आहे. काही शेतकऱ्यांचे डबल बाॅंड भरण्यात आले असून याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या उसाचे बिल अद्याप मिळालेले नाही. ही थकबाकी तत्काळ देण्यात यावी. कारखान्याच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या समोर येऊन उत्तरे द्यावीत असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला आहे. ते येईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी मदन पाल सिंह ठाकूर, प्रमोद भगत, प्रमपाल सिंह, संतोष शर्मा, सुभाष शर्मा, राजेंद्र, पप्पू, अहमद सईद, ललित, मोंटू, राधे, अमित आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here