मोदी नॅच्युरल्स स्थापन करणार इथेनॉल प्लांट

रायपूर : मोदी नॅच्युरल्स कंपनीने छत्तीसगडमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सने उसळी मारली आहे. या योजनेसाठी मोदी नॅच्युरल्सने मोदी बायोटेक (एमपीबीएल) या १०० टक्के पूर्ण स्वामित्व हक्क असलेल्या कंपनीला सहभागी करुन घेतले आहे. एमपीबीएल कंपनीला छत्तीसगड सरकार बरोबर सामंजस्य करार करण्यासह केंद्र सरकारकडून इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी २१० केएलडी डिस्टिलरीसाठी मंजुरी मिळाली आहे.

या योजनेसाठी पुढील दोन वर्षांत जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ११० केएलडीसाठी १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हे काम एका वर्षात पूर्ण होईल. कंपनीने योजनेसाठी आधीच जमीन खरेदी केली आहे. प्लांट आणि मशीनरी ऑर्डर देण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत प्लांट सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here