तामीळनाडू : साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मदुराई : अलंगनल्लूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये खासदार सु व्यंकटेशन यांनी सहभाग घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना २०२१-२२ या हंगामासाठी सुरू करण्याची मागणी केली. हा एकमेव सहकारी साखर कारखाना तामीळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यासाठी कार्यरत कारखाना आहे.

गेल्या १३ दिवसांपासून कारखान्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये देऊन गाळप सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. खासदार सु व्यंकटेशन म्हणाले, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पलाकोड आणि तिरुपत्तूर येथील सहकारी साखर कारखाने सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. आता त्यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार व्यंकटेशन यांनी सांगितले की हजारो कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांची उपजिविका कारखान्यावर अवलंबून आहे. सु व्यंकटेशन म्हणाले की, जर कारखान्यात वीज आणि इथेनॉल उत्पादन सुरू केले गेले, तर कारखाना फायदेशीररित्या काम करू शकतो. तामीळनाडू ऊस उत्पादक शेतकरी संघाचे राज्य अध्यक्ष पलानीसामी यांनी सांगितले की यावर्षी कारखान्याकडे १८५० एकर ऊस नोंदणीकृत झाला आहे. तर कार्यक्षेत्रात ६०,००० टन ऊस आहे. शेतकरी जवळपास १७००० टन ऊस उपलब्ध करण्यास तयार आहेत. हा ऊस नोंदणी केलेला नाही. त्यामुळे कारखाना सुरू करणे अवघड नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here