बजेट २०२२-२३ : जाणून घ्या देशाच्या बजेटबाबत सर्व अपडेट्स

गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेटपूर्व बैठका घेत आहेत. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावेळीही १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहा. अर्थमंत्री सीतारमण या चौथ्यांदा बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्पाला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्व आहे. त्याची सर्वांना प्रतीक्षा असते.

एक फेब्रुवारी २०२२ रोजी सादर होणाऱ्या बजेटकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. अर्थमंत्री देशातील आर्थिक खर्चाचे विवरण सादर करतील. याअनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे. सर्वसामान्य लोकांकडूनही बजेटबाबत सुचना आणि संकल्पना मागविण्यात आल्या आहेत. सरकारी वेबसाईटच्या माध्यमातून या संकल्पना थेट अर्थ मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याची सोय करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कोविड काळात अर्थमंत्री सीतारमण यांनी बजेट सादर केले होते. त्यावेळी त्यांनी टॅबचा वापर केला होता. २०२२ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना त्याला वही-खाते असे नाव देऊन ते लाल रंगाच्या कापडात गुंडाळून सादर करण्यात आले होते. त्यातून अर्थमंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षांची ब्रिफकेस परंपरा संपुष्टात आणल्याचे मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here