महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५,००० कोटींची एफआरपी अदा

पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५,०६५.४५ कोटी रुपयांचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) शेतकऱ्यांना दिला आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २६ डिसेंबर २०२१ अखेर महाराष्ट्रात एकूण १८८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी तसेच ९३ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४३१.०६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ४१३.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६० टक्के आहे.

Thehindubusinessline.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, १५ डिसेंबर २०२१ पर्यंत एकूण देय असलेल्या ७,५८८.४४ कोटी पुपये एफआरपीपैकी ५०६५.४५ कोटी रुपये एफआरपी देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार ६६ कारखान्यांनी या हंगामात १०० टक्के एफआरपी दिली आहे. आणि १०९ कारखान्यांकडे एफआरपीची कोणतीही थकबाकी नाही. १८ कारखान्यांनी ८०-९९ टक्के एफआरपी दिली आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपीबाबत वाद निर्माण झाला होता. कारखान्यांनी एफआरपी देण्यास उशीर करू नये अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here