अलीगड : साथा साखर कारखान्याच्या विस्तारीकरण, अद्ययावतीकरणाची बहुप्रतीक्षीत मागणी पूर्ण झाल्याची घोषणा साखर कारखाना मंत्र्यांनी गुरुवारी केली. नव्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी नव्या साखर कारखान्यात ऊस घेऊन जातील असे मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे.
ऊस मंत्री सुरेश राणा म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून दीर्घ कालावधीपासून कारखाना अद्ययावतीकरणाची मागणी केली जात होती. जिल्ह्याचा प्रभारी मंत्री असल्याने हा विषय मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणला गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विभागातील नऊ साखर कारखाने इंटिग्रेटेड शुगर कॉम्प्लेक्सच्या रुपात विकसीत करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी केली आहे. साथा साखर कारखान्याची क्षमता १२५० टीसीडीवरून ५००० टीसीडी केली जाईल.
याशिवाय इथेनॉल प्लांट, २० मेगावॅट इन्सिडेंटल को जनरेशन योजनाही लागू होईल. अलिगड कारखान्याची स्थापना १९७४ मध्ये झाली होती. दरम्यान, शेतकरी नेते शैलेंद्र पाल सिंह म्हणाले, आधीही नेत्यांनी यााबबत घोषणा केली होती. मात्र, त्यांची पूर्तता झालेली नाही.