चेन्नई : चेन्नईत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. अण्णा नागोटा परिसराततील व्हीआर मॉलच्या छताचा एक भाग कोसळल्याची घटना घडली. पावसामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे माऊंट रोडसह अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे चेम्ब्रामक्कम धरणातून १००० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चेन्नईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रोहापेट्टाहमध्ये अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यालय परिसरही जलमय झाला आहे. पाण्याचे वाढते प्रमाण पाहून चार सब वे बंद करण्यात आले आहेत असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. एकुण सात विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांवर जवळपास दोन दोन फूट पाणी साचले. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणीतून मार्ग काढावा लागला. वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. मायलापूर, एवर सलाई, कोलाथूर आदी भाग जलमय झाले आहेत असे सांगण्यात आले.