उत्तर प्रदेश इथेनॉल उत्पादनात गतीने प्रगती करेल : पंतप्रधान मोदी

मेरठ : उत्तर प्रदेश आता ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल उत्पादनात गतीने प्रगती करत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी मेरठ येथे ध्यानचंद क्रीडा विश्वविद्यालयासाठी कोनशिला पूजन केले.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांपासून उत्तर प्रदेशातून जवळपास १२,००० कोटी रुपयांच्या इथेनॉलची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here