आयओसीएलने आज, ४ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. जवळपास गेल्या २ महिन्यांपासून तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आजही इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय बाजारपेठेत ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह वाराणसी, कानपूर, आग्रा, मेरठ, प्रयागराज आदी ठिकाणी दरात बदल झालेला नाही.
दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर तर डिझेल 86.67 रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर
आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये लीटर आणि डिझेल ८९.७९ रुपये लीटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०७.२३ रुपये आणि डिझेल ९०.८७ रुपये प्रती लिटर आहे. जयपूरमध्ये पेट्रोल १०७.०६ रुपये तर डिझेल ९०.७० रुपये प्रती लिटर आहे. रांची येथे पेट्रोल ९८.५२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.५६ रुपये प्रती लिटर आहे. तर चंदीगडमध्ये पेट्रोल ९४.२३ रुपये आणि डिझेल ८०.९० रुपये प्रती लिटर आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या टॅक्समुळे हे इंधन सर्वसामान्यांना महाग दराने मिळते.