मेरठ : पावसामुळे साखर कारखान्यासमोर निर्माण झालेले ऊस टंचाईचे संकट दूर होऊ लागले आहे. रात्री उशीरा कारखान्याचा तिसरा प्लांट सुरू झाला असून आता प्रती दिन एक लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात येत आहे. हवामान बदलामुळे ७ जानेवारीपासून सुरू झालेल्या पावसाने साखर कारखान्याच्या गळीत हंगामात अडथळे निर्माण केले. ऊस नसल्याने तीन दिवस नो केन स्थितीत कारखान्याचे दोन प्लांट बंद राहिले होते.
मात्र, आता स्थिती सुधारत असून ८ व ९ जानेवारी रोजी ८५ क्विंटल ऊसाचे गाळप होऊ शकले. दुसरीकडे १५६ ऊस खरेदी केंद्रांत पाणी भरल्याने ऊस स्वीकारणे बंद केले होते. आता ऊसाची आवक वाढल्याने तिसरा प्लांटही सुरू करण्यात आला आहे. बुधवारी ऊस खरेदी केंद्रांवर ऊस घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड ट्रकची रांग लागल्याचे दिसून आले. कारखान्याचे अप्पर महाव्यवस्थापक विरेंद्र सिंह यांनी सांगितले की, तिसरा प्लांट सुरू झाला आहे. आता पूर्ण क्षमतेने एक लाख क्विंटल उसाचे गाळप होईल. ऊसाची आवक वाढली की सव्वा लाख क्विंटलपर्यंत गाळप होऊ शकेल. ऊस खरेदी केंद्रांपैकी ७० केंद्रे आतापर्यंत सुरू झाली आहेत.