नमक्कल : ऊस शेतीच्या क्षेत्रामध्ये होणारी वृद्धी पाहता चालू गळीत हंगामात सालेम सहकारी साखर कारखाना १.६० लाख टन ऊस गाळप करण्याची योजना तयार करण्यात आली आहे, असे तामीळनाडूचे पर्यटन मंत्री एम. मॅथिवेन्थान यांनी सांगितले.
मंत्री मॅथिवेन्थान यांनी कारखान्याच्या ३८ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र वितरीत केले. ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू गेल्या ३० वर्षात कारखान्यात काम करताना झाला आहे, अशा कुटूंबांन हा लाभ देण्यात आला. ते म्हणाले, २०२०-२१ या हंगामात कारखान्यांनी १.१४ लाख टन ऊस गाळप केले होते. २०२१-२२ या हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४,०७५.३० एकर ऊस नोंदणी करण्यात आली आहे. आम्ही १.६० लाख टन ऊसाचा गाळप केला आहे. मंत्री एम. मॅथिवेन्थान यांनी सांगितले की, कलकुरची येथील दोन इतर सहकारी समित्यांकडून ५०,००० टन ऊस गाळपाची अपेक्षा आहे. त्यामुळे चालू हंगामात २.१० लाख टन ऊस गाळप होईल अशी शक्यता आहे. पुढील वर्षी ते तीन लाख टनापर्यंत जाईल.