ढाका : थायलंड, जपान आणि संयुक्त अरब अमिरात येथील कंपन्यांच्या एका संयुक्त संघटनेने बांगलादेश सरकार सोबत सामंजस्य करारात तीन नव्या साखर कारखान्यांसाठी Tk5,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे. बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या (BSFIC) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून आर्थिक मदत दिलेल्या कारखान्यांना पूर्वीही परदेशी मदत मिळाली आहे. Sugar International Coने अलीकडच्या करारात उद्योगासाठी आपल्या भागीदारीचा प्रस्ताव सादर केला आहे.
BSFICचे अध्यक्ष मोहम्मद अरिफुर रहमान अपू यांनी सांगितले की, कन्सोर्टियमने संयुक्त रुपात तीन नवे आधुनिक साखर कारखाने स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ते म्हणाले, साखर उद्योगासाठी ही गुंतवणूक खूप सकारात्मक ठरेल. थायलंड, जपान आणि संयुक्त अरब अमिरातमधील कंपन्यांनी दिलेला प्रस्ताव पंतप्रधान शेख हसीना यांच्या अंतिम मंजुरीसाठी प्रलंबीत आहे. प्रस्तावित कारखान्यांसाठी सरकारी मालकीच्या जमिनीवर ऊस शेती करावी की नाही, याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे. गुंतवणुकदारांचे स्थानिक प्रतिनिधी मोहम्मद इमदाद हुसेन यांनी सांगितले की, BSFIC सोबत भागिदारीत तीन नवे कारखाने स्थापन केले जातील. आम्ही आधीच सादर केलेला प्रस्ताव जर सरकारने मंजूर केला तर आम्ही पुढे पावले उचलू.