लातूर : महाराष्ट्रातील साखर उद्योगाला बहर आला आहे. आता मराठवाडा क्षेत्रातील लातूर जिल्ह्यामध्ये आणखी दोन ऊस गाळप युनिट सुरू होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लातूरचे भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार रमेश कराड यांनी सांगितले की, जिल्ह्यात २००० टन प्रती दिन संयुक्त क्षमतेची दोन युनिट्स स्थापन केली जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लातूर आणि रेणापूर तालुक्यामध्ये ही युनिट्स सुरु होतील.
कराड यांनी सांगतिले की, शेतकरी आणि साखर सहकारी समित्यांच्या सदस्यांऐवजी राजकीय नेतेच कारखान्यांचे मालक बनले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे शोषण थांबविण्यासाठी दोन ऊस गाळप युनिट्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.