लखनौ : उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या आधी बजाज ग्रुपच्या साखर कारखान्याशी संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपये मिळणार आहेत. ऊस विभागाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यासंबंधी कडक भूमिका घेतली आहे. बजाज ग्रुपच्या साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना ५०० कोटी रुपयांची थकीत बिले दिली जातील. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने लाखो शेतकऱ्यंचे पैसे देण्याबाबत बजाज ग्रुपच्या साखर कारखान्यांना कारवाईचा इशारा दिला होता. जर वेळेवर पैसे दिले गेले नाहीत, तर पैसे जप्त केले जातील असे बजावण्यात आले होते. योगी सरकारने बजाज ग्रुपच्या पॉवर कंपनीला ऊसाची थकबाकी न दिल्यास पैसे जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बजाज ग्रुपने आज ५०० कोटी रुपयांची बिले देण्याची घोषणा केली आहे.