सात महिन्यानंतर साखर कारखान्याचे डिस्टीलरी युनिट सुरू

फारुखाबाद : आधी प्रदुषणामुळे तीन वर्षापर्यंत बंद राहिलेल्या कायमगंज साखर कारखान्याचे डिस्टिलरी युनिट गेल्यावर्षी सुरू झाली. मात्र नंतर काही दिवसांत तांत्रिक बिघाडामुळे ते बंद झाला. आता सात महिन्यानंतर डिस्टलरी पुन्हा सुरू झाली आहे.

याबाबत जागरण डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नोटिसीनंतर साखर कारखान्याची डिस्टीलरी आणि इथेनॉल युनिट गेल्या तीन वर्षांपासून बंद होते. हे युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी २६ कोटी रुपये खर्चुन जेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्लांट सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर डिस्टिलरी व इथेनॉल युनिट सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला मिळाल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये हे युनिट सुरू करण्यात आले. मात्र कधी बॉयलरसाठी बगॅस नसल्याने तर कधी कामगारांची समस्या असल्याने आणि इतर तांत्रिक बिघाडानंतर युनिट हळूहळू सुरू होते. जून २०२१ मध्ये बॉयलरमध्ये खराब झाल्यानंतर डिस्टिलरी पुन्हा बंद झाली. त्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. २६ कोटी रुपये खर्चून प्रदूषण नियंत्रण करणारा जेडएलडी प्लांट तयार झाला. चार डिसेंबर रोजी लखनौ येथे कारखान्याचे एमडी रमाशंकर पांडे यांनी २५ डिसेंबरपर्यंत डिस्टीलरी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आता उत्पादन सुरू झाले आहे अशी माहिती डिस्टीलरी मॅनेजर आर. के. मिश्रा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here