अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी चलनात साखरेसह इतर वस्तूंच्या निर्यातीस मंजुरी

इस्लामाबाद : कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीने शुक्रवारी अन्नधान्य संकट आणि युद्धग्रस्त देशाची स्थिती समोर असल्याने पाकिस्तानी चलनात अफगाणिस्तानला निवडक वस्तूंची निर्यात करण्यास अनुमती दिली आहे. यामध्ये साखर व इतर वस्तुंचा समावेश आहे. अर्थ आणि महसूल मंत्री शौकत तारिन यांच्या अध्यक्षतेखाली ही ईसीसीची बैठक झाली.

या बैठकीला राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्री सैयद फखर इमाम, उद्योग आणि उत्पादन मंत्री मखदूम खुसरो बख्तियार, जल संसाधन मंत्री चौधरी मुनिस इलाही आदी सहभागी झाले होते. अफगाणीस्तानला स्थानिक चलनात निर्यातीबाबतचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने पाठवला होता. निर्यात धोरण आदेश २०२० च्या कलम ७ (१) अन्वये असलेल्या वस्तूंच्या यादीत मासे, साखर, तांदुळ आणि मांससह काही निवडक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. ईसीसीने या बैठकीत इतर अनेक प्रस्तावांनाही मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here