त्रिवेणी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले अदा

मुरादाबाद : ७३ व्या प्रजासत्ताक दिनी रानीनांगल त्रिवेणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना १४ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी १०९७.५८ लाख रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.

रानीनांगल येथील त्रिवेणी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. व्यंकटरथनम यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून १४ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १०९७.५८ लाख रुपये पाठविण्यात आले आहेत. यावेळी कारखान्याचे अप्पर महाव्यवस्थापक (ऊस) टी. एस. यादव यांनी साखर कारखान्याला साफ, ताजा ऊस पाठवावा असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी ऊस क्रशर, गुऱ्हाळघरांना विक्री करू नये असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here