भारतात कोरोनाचे नवे २.३५ लाख रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट १३.३९ टक्क्यांवर

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत २.३५,५३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सुत्रांनी ही माहिती दिली.

सरकारकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्हीटीच्या दरात १५.८८ टक्क्यांवरुन १३.३९ टक्के अशी घसरण झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दरातही १७.४७ टक्क्यांवरुन १६.८९ टक्के अशी घट झाली आहे. देशात सध्या २०,०४,३३३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ४.९१ टक्के इतके आहे.

गेल्या २४ तासांत ३,३५,९३९ जण कोरोनापासून पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,८३,६०,७१० इतकी झाली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट ९३.६० टक्क्यांवरुन ९३.८९ टक्के झाला. लसिकरणाच्या पातळीवरही जोरदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत १६५.२४ कोटी डोस देण्यात आले आहेत. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेला गती आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here