मेरठ : टिकोला साखर कारखाना रामराजने चालू गळीत हंगाम २०२१-२२ मधील १८ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी बिले संबंधित समित्यांना पाठविली आहेत. रामराज समितीच्या सचिवांनी यास दुजोरा दिला आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले.
टिकोला साखर कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष महेशचंद्र शर्मा यांनी सांगितले की, साखर कारखान्याने १८ ते २४ जानेवारी या कालावधीत खरेदी केलेल्या ऊसापोटी १८ कोटी ४९ लाख रुपयांची बिले समित्यांकडे पाठविली आहेत. ऊस समितीचे सचिव सुभाषचंद्र यादव यांनी सांगितले की, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील. शेतकऱ्यांनी स्वच्छ ऊस कारखान्याला पाठवावा असे आवाहन केले आहे. कारखाना शेतकऱ्यांना वेळेवर बिले देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारखान्याचे ईडीपी व्यवस्थापक ऋषिपाल धाम यांनी सांगितले की, कारखान्याकडून दर आठवड्याला शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत.