इथेनॉल सोबतच मिश्रण न केलेले इंधन ऑक्टोबर महिन्यापासून महागणार आहे. खासगी इंधनाच्या किरकोळ विक्रेत्यांना मिश्रण केलेले इंधन विक्रीसाठी तसेच इथेनॉलचा खप वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट सादरीकरण्याचा भाषणात सांगितले की, इंधनाचे मिश्रण करण्यास सरकारचे प्राधान्य आहे. इंधनाच्या मिश्रणास प्रोत्साहन देण्यासाठी अमिश्रीत इंधनावर ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या दिवसापासून प्रती लिटर २ रुपये अतिरिक्त एक्साइज ड्यूटी लागू केला जाणार आहे.
सध्या इंडियन ऑईल, एचपीसीएल, बीपीसीएल सारख्या सरकारी कंपन्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करतात. तर खासगी कंपन्या मिश्रणाविना पेट्रोलची विक्री करतात.