फिलीपाइन्स : शेतीसाठीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांसह साखर उत्पादकही हवालदिल

मनिला : फिलीपाइन्समधील ऊस उत्पादक शेतकरी महागाईने हवालदिल झाले आहेत. राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांच्या सरकारला मुलभूत कृषी उत्पादनांसाठी वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे देशात साखरेचे कोठार मानल्या जाणाऱ्या भागात गरीबी आणि सामाजिक अशांततेची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष रेमंड मोंटिनोला यांनी सांगितले की, शेतकरी या पिकांसाठी हंगामातील उच्च किमतीमुळे आवश्यक ती खते वापरण्याचे धाडसही करीत नाहीत. त्यामुळे आमची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. देशातील एकूण ४,२३,३३३ हेक्टर क्षेत्रापैकी ५३ टक्के शेती क्षेत्र नेग्रोस ऑक्सिडेंटलमध्ये आहे. येथील संभाव्य भयानक आणि अराजकाच्या स्थितीला रोखण्यासाठी सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे असे मोंटिनोला म्हणाले.

युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशनचे अध्यक्ष मॅन्युअल लमाता यांनी कृषी विभाग आणि व्यापार तसेच उद्योग विभागाने खतांच्या दरावर आळा घालणे अथवा अनुदानासह उत्पदकांना सहाय्य करण्याची मागणी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
लमाटा आणि मोंटिनोला यांनी सांगितले की, खतांसाठीचा खर्च गेल्या दोन वर्षात जवळपास तिप्पटीने वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here