हरियाणातील अंबालामध्ये थकीत ऊस बिलांमुळे शेतकरी अडचणीत

अंबाला : गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अंबालातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नारायणगड साखर कारखाना हंगामात नोव्हेंबर महिन्यात सुरू झाल्यानंतर ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर बिले देऊ शकलेला नाही. शेतकऱ्यांना वारंवार आंदोलने करण्याची वेळ आली आहे. बिले मिळावीत यासाठी आटापीटा करावा लागतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात संपलेल्या गेल्या हंगामातील २७.५९ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यास गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंजुरी देण्यात आली होती.

याबाबत द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा यांनी सांगितले की, कारखान्याने चालू हंगामात २३ नोव्हेंबर रोजी कामकाज सुरू केले. ४ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले देण्यास मंजुरी दिली आहे. यंदा जादा पावसामुळे गहू आणि सूर्यफूल आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तशात ऊस बिलेही अडकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च चालवणे मुश्किल झाले आहे. गेल्या हंगामातील पोस्ट डेटेड चेक थकीत आहेत. या मुद्यावर चर्चासाठी ७ फेब्रुवारी रोजी शेतकरी पंचायत आयोजित केली आहे. यावेळी समिती कठोर निर्णय घेईल.
दरम्यान, ऊस बिले देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. लवकर पैसे शेतकऱ्यांना मिळतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here