मंड्या : राज्य सरकार मंड्या येथील बंद पडलेल्या माय शुगर साखर कारखान्याच्या (Mysugar mill) पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करीत आहे अशी माहिती मंड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोपालय्या यांनी दिली. मंत्री गोपलय्या यांनी विविध विकास योजना आणि मंड्या जिल्ह्यातील कोविड १९च्या स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, माय शुगर साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी एक व्यापक योजना तयार केली जाणार आहे. त्यापू्र्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गोपालय्या म्हणाले, सरकारने मंड्या जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वोतोपरी मदतीचा निर्णय घेतला आहे. मंड्या जिल्ह्यासाठी मंत्रीपदाचा कार्यभार मिळाल्यानंतर मी माय शुगर साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व माहिती घेतली आहे. आता जेव्हा कॅबिनेटची बैठक होईल, तेव्हा या मुद्यावर विस्ताराने चर्चा केली जाईल.