इंधन दराचे नवे अपडेट्स, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नवी दिल्ली : इंधन कंपन्यांनी दररोज प्रमाणे आज, ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर अपडेट केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात तीव्र उतार-चढाव दिसून आल्यानंतरही राष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. निवडणूक संपुष्टात आल्यानंतरच पेट्रोल, डिझेलचे दर बदलू शकतात.

३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज कर घटवल्यानंतर आतापर्यंत दर स्थिर आहेत. मात्र, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअर येथे ८२.९६ रुपये प्रती लिटर तर डिझेल ७७.१३ रुपये प्रती लिटर आहे. महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर दिल्लीत स्वस्त ९५.४१ रुपये प्रती लिटर आहे. व्हॅटमुळे इंधन दर वेगवेगळे असतात. दिल्लीत २ डिसेंबरपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here