रामपूर : भारतीय किसान युनियनने निवडणुकीच्या रणधुमाळीत बंद साखर कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांची अडचण दूर होईल आणि हजारो लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. साखर कारखान्याच्या जमिनीवरील अवैध ताबा हटविण्याची मागणी केली आहे.
याबाबत लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, विकास भवनजवळील कार्यालयात झालेल्या पंचायतीमध्ये जिल्हाध्यक्ष हसीब अहमद यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून रामपूर साखर कारखाना बंद पडला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही कारखाना सुरू होऊ शकलेला नाही. राज्यातील सत्तारुढ सरकारला कारखाना सुरू करता आलेला नाही. कारखाना बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर हजारो लोकांचा रोजगार हिरावून घेतला गेला आहे. कारखान्याच्या अब्जावधी रुपये किमतीच्या जमिनीवर ताकदवान लोकांनी कब्जा केला आहे.
त्यांनी नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारने बंद साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी सिंचन विभागाची जमीन वाटपाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी सिंचन विभागाने निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अपात्र लोकांना जमिनीचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर या विरोधात आंदोलन केले जाईल. पंचायतीमध्ये अमृत सिंह बिट्टू ,मेहंदी हसन, अमीर अहमद, सुनील सागर, सलीम टेलर, रेहान अली, चौधरी सुंदर सिंह, महेंद्र सिंह, गजराम सिंह, चंद्रपाल सिंह आदी उपस्थित होते.