बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
साओ पावलो (ब्राझील): चीनी मंडी
जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील साखर कंपन्या आता अल्गोरिदमच्या साह्याने साखरेच्या किमतींवर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे साखरेच्या किमती नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत. याचा अचूक अंदाज लावता येणार आहे.
साओ पावलोमधील रायझेन एन्गिरिया एसए या कंपनीने क्वांटमब्लॅक या कंपनीकडून कॉम्प्युटरवर अल्गोरिदम सिस्टम डेव्हलप करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या साह्याने साखरेच्या किमती कोणत्या दिशेने चालल्या आहेत, याचा अंदाज लावता येणार आहे. येत्या वर्षभरात ही सिस्टम लागू होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये पूर्वीचा डेटाही समाविष्ट करण्यात येणार असून, कंपनीचा ८ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्राचा याजवरचा सर्व डेटा यामध्ये असेल. त्यानुसार ऊस क्षेत्रातील पॅटर्नवरून त्याच्या पुरवठ्याचा अंदाज बांधता येणार आहे.
जगभरात गुंतवणूकदारांकडून अशा प्रकारच्या अल्गोरिदमचा वापर केला जातो. त्यानुसार ते शेतीच्या बाजारपेठांमधील गुंतवणूक ठरवत असतात. गेल्या काही वर्षांत सल्लागार आणि ट्रेडिंग कंपन्यांना अशा प्रकारच्या अल्गोरिदमचा खूप फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच त्याचा वापर होणार असून, तोही रायझेन सारख्या बड्या कंपनीकडून होणार आहे. याद्वारे साखरेच्या किमतीचे अंदाज सुधारतील, अशी आशा रायझेनला आहे.
कंपनी त्यांच्या रिक्स मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीमध्ये या अॅनालिटिकल टूल्सचा वापर करणार आहे. एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे याचा हाय स्पीड वापर करण्याचा उद्देश नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. सध्या रायझेनचे ब्राझीलमध्ये २६ साखर कारखाने आहेत. त्यातून दरवर्षी ४३ लाख टन साखर तयार केली जाते. देशाच्या एकूण साखर निर्यातीमध्ये रायझेनचा वाटा १५ टक्के आहे. कंपनीची सिंगापूरमधील रॉ नावच्या कंपनीशी भागिदारी आहे. पण, क्वांटमब्लॅक सिस्टमचा रॉ कंपनीशी संबंध नसल्याचे रायझेनने स्पष्ट केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp