मुझफ्फरनगर : त्रिवेणी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २८ जानेवारी २०२२ पर्यंतची ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली.
त्रिवेणी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांकडून २८ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी २३.०८ कोटी रुपयांची बिले दिली आहेत, असे डॉ. अशोक कुमार म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी हंगामात लावण करण्यासाठी आपल्या जवळच्या नर्सरीतून ऊसाच्या रोपांचे बुकिंग करावे. ऊस लावणीच्या वेळी शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्माचा वापर करावा असे सल्ला त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला साफ, स्वच्छ आणि ताजा ऊस पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.