दार एस सलाम : टांझानियातील झांजीबारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांना स्वस्त साखर उपलब्ध करुन देण्यासाठी आयात शुल्कात ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. साखरेच्या आताय शुल्कात कपात केल्याची घोषणा करताना झांजीबारचे व्यापार आणि औद्योगिक विकास मंत्री उमर सईद शाबान यांनी व्यापाऱ्यांना व्यावसायिक लाभासाठी साखरेच्या आयात शुल्कातील कपातीचा दुरुपयोग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.
शाबान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने साखरेवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी दरात साखर खरेदी करता येईल. सरकारकडून जागतिक बाजारातील कमोडीटीच्या दरांचा आढावा घेतला जात आहे असे शाबान म्हणाले. व्यापाराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा यावेळी मंत्र्यांनी दिला.