गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये पेट्रोल पंपांवर आता इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्री सुरू करण्यात आली आहे. नॉर्थ इस्ट इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे (एनईआयपीडीए) अध्यक्ष राजीव गोस्वामी यांनी स्थानिक वेबपोर्टलला सांगितले की, असोसिएशनच्या अनेकवेळा विरोधानंतरही ७ फेब्रुवारीपासून किरकोळ दुकाने आणि त्यानंतर वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला आहे.
याबाबत इंडिया टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गोस्वामी यांनी सांगितले की, मेघालय आणि त्याखालील आसाममद्ये सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रणाचा पुरवठा करण्यात आला आहे. देशाच्या बहुतांश भागात डिझेलचा दर एक ऑक्टोबरपासून २ रुपये प्रती लिटरने वाढू शकतो. इंधनात मिश्रणास सरकारचे प्राधान्य आहे. सीतारमण यांनी आपल्या बजेटच्या भाषणात सांगितले होते की, इंधनात इथेनॉल मिश्रणास प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉल मिश्रण नसलेल्या इंधनावर ऑक्टोबर २०२२ पूर्वी २ रुपये प्रती लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे.