भोगपूर : भोगपूर सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक अरुण अरोरा, बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमन परमवीर सिंह पम्मा यांनी सांगितले की, साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला होता. हंगामात ३६ लाख क्विटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १६.५० लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. साखरेचा उतारा चांगला आहे. आतापर्यंत १० टक्के उतारा मिळाला आहे.
चेअरमन परमवीर सिंह पम्मा यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून उत्पादित वीज उत्पादक प्लांटकडून ६.५० कोटी रुपयांची अतिरिक्त वीज विक्री करण्यात आली आहे. तसेच कारखान्याकडून आतापर्यंत ५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. अरुण अरोडा यांनी सांगितले की, आपल्या परिसरात नोंदण्यात आलेला ऊस उचलण्यास कारखाना सक्षम आहे. हंगामात हा ऊस संपल्यानंतरच कारखाना बंद केला जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काहीजण चुकीच्या पद्धतीने कारखान्याविषयी प्रचार करीत आहेत. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये. कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे.