नवी दिल्ली : सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स सकाळी ५६,७२०.३२ अंकांवर खुला झाला. तो शुक्रवारी ५८,१५२.९२ अंकांवर बंद झाला होता. सकाळी साडेनऊ वाजता बीएसईच्या सेन्सेवर ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर मायनसमध्ये ट्रेड करत होते. फक्त टीसीएस प्लसमध्ये राहिला. सेन्सेक्समध्ये १४२१ अंकांची घसरण दिसून आली.
बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव राहिला. महिंद्रा अँड महिंद्रा बँक सर्वाधिक खालावला. टीसीएस ३७७३.४० वर ट्रेड करीत होता. तर एसबीआय -४.१५ टक्क्यांनी घसरुन ५०७.३५ वर ट्रेड करीत होता. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली. सकाळी निफ्टी १७,०७६.१५ अंकांवर खुला झाला. त्यानंतर त्याने १६,९१६.५५ या निच्चांकी पातळीस स्पर्श केला. साडेनऊ वाजता २.२३ टक्के म्हणजेच ३८८.२० अंकांनी खालावून १६,९८६.५५ अंकावर निफ्टी ट्रेड करीत होता. बँक निफ्टी १०९७.५० अथवा २.८५ टक्के घसरला. पीएनबी, फेडरल बँक, एसबीआय, आरबीएल आदी शेअर्समध्ये घसरण झाली.
बँकिंग शेअर्सवर मोठा दबाव होता. एबीजी शिपयार्डवर सीबीआयने फसवणकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक २२ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रातील शेअर्सवर झाला.