मुजफ्फरनगर : खतौली येथील त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले अदा केली आहेत.
साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी सांगितले की, त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडट्रीज शुगर मिलने शेतकऱ्यांना ४ फेब्रुवारी २०२२ अखेरच्या ऊस बिलांपोटी २६.७८ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ताजा आणि स्वच्छ उसाचा पुरवठा करावा. तसेच आगामी काळातील लागवडीसाठी चांगल्या वाणाचा वापर करावा असे आवाहन कारखान्याच्यावतीने करण्यात आले आहे.