कच्च्या तेलाचे दर भडकले, राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेल मात्र स्थिर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकी स्तरावर आहेत. मात्र, देशात दिवाळीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ब्रेंट क्रूड ९५ डॉलर प्रती बॅरलदवळ आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर जबरदस्त भडकले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती ९५ डॉलर प्रती बॅरलजवळ पोहोचल्यानंतरही दर स्थिर आहेत. अभ्यासकांच्या मते उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर देशात या दरात वाढ होईल. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतमध्ये २ डिसेंबर २०२१ पासून इंधन दर स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आज, १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

इंधनावरील व्हॅटमुळे वेगवेगळ्या राज्यात, शहरात दर वेगवेगळे असतात. महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर दिल्लीत स्वस्त ९५.४१ रुपये प्रती लिटर आहे. व्हॅटमुळे इंधन दर वेगवेगळे असतात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here