बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
शामली (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
शामली जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस खरेदीमध्ये अव्वल स्थानी असले तरी, ऊस उत्पादकांची देणी भागवण्यात अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांकडे ४१८ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयांची थकीत देणी आहेत. गाळप हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांत कारखान्यांना केवळ ४९ कोटी ६६ लाख ७७ हजार रुपयांचीच देणी भागवता आली आहेत.
जिल्ह्यात साखर कारखान्यांनी नोव्हेंबरमध्ये गाळप सुरू केले होते. हंगामाच्या सव्वा तीन महिन्यात शामली साखर कारखान्याने केवळ १५ कोटी रुपयांची देणी भागवली आहेत. थानाभवन कारखान्याने १३ कोटी ३० लाख, ऊन कारखान्याने २१ कोटी ३६ लाख रुपयांची देणी भागवली आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत १६८ लाख ५१ हजार क्विंटल ऊस खरेदी केला आहे. त्याची किंमत ४६७ कोटी ९२ लाख रुपये होते. यात शामली कारखान्याने जवळपास १२८ कोटी, थानाभवनने २१६ कोटी ६७ लाख तर, ऊन कारखान्याने १२२ कोटी ७६ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर ४१८ कोटी २४ लाख रुपयांची देणी आहेत. यात शामली कारखान्याचे ११३ कोटी ४६ लाख, थानाभवन साखर कारखान्याचे २०३ कोटी ३८ लाख तर ऊन कारखान्याचे १०१ कोटी ३९ लाख रुपये थकीत आहेत.
यासंदर्भात जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिली भारती यांनी सांगितले की, शामली कारखान्याची अल्प मुदतीच्या कर्जाची प्रक्रिया १५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या कर्जाची रक्कम आल्यानंतर शेतकऱ्यांची देणी काही अंशी भागवली जातील. यात प्रामुख्याने गेल्या हंगामातील देणी भागवण्यात येणार आहेत. दरम्यान, किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांनी शामली साखर कारखान्यांच्या थकबाकी संदर्भात जिल्हाधिकार अखिलेश कुमार सिंह यांची भेट घेतली होती. त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp