बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखर उद्योगातील बँकांशी संबंधित काही प्रश्न सोडविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने येत्या १५ फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक बोलविली आहे. दिल्लीत कृषी भवनमध्ये सकाळी ११च्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे.
या बैठकीमध्ये साखर उद्योगाचे बँकांशी निगडीत प्रश्न चर्चेला घेतले जणार आहेत. यामध्ये साखर उद्योगाबरोबरच अर्थसेवा विभागाचे प्रतिनिधी, मोठ्या बँकांचे प्रतिनिधी तसेच ‘इस्मा’, ‘एनएफसीएसएफ’ आणि ‘एआयएसटीए’ या संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये शेड्युल्ड बँकांकडून संबंधित साखर कारखान्यांना त्याच्या बफर स्टॉकवर १०० टक्के अर्थ पुरवठा करणे, साखर कारखान्यांना तोंड द्यावा लागत असलेला कॅश क्रेडिटच्या मर्यादेचा प्रश्न, तसेच शॉर्ट मार्जिनचा तिढा आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार साखर साठ्याचे मुल्यांकन करणे या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीला सहकार खात्याचे प्रधान सचिव, साखर आयुक्त यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी तसेच साखर उद्योगातील अग्रणी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp