स्थानिक साखर पुरवठा सुरळीत ठेवण्याचा MSM Malaysia आणि Wilmar Sugar यांच्यामध्ये करार

क्वॉलालंपूर : एमएसएम मलेशिया होल्डिंग्स बीएचडी (MSM Malaysia) आणि विल्मर शुगर पिटीई लिमिटेडने (Wilmar Sugar) डिसेंबर २०२१ मध्ये एक कायमस्वरुपी साखर पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी करार केला आहे. MSM Malaysia आणि Wilmar Sugar साखर पुरवठा साखळी अंतर्गत कच्च्या साखरेच्या सोर्सिंगसाठी परस्परांना सहकार्य करणे, पाठबळ देण्याचे संयुक्त प्रयत्न सुरू करतील.

याबाबत Nst.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृ्त्तानुसार एमएसएम मलेशिया समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैयद फीजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, विल्मर शुगर सोबतच्या सहकार्याने आम्ही एमएसएम मलेशियाची ईएसजी बनू शकतो. तसेच प्रीमियम साखरेबाबत कायमस्वरूपी रिफायनरीच्या स्वरुपात जागतिक स्तरावरील व्यापक बाजारपेठेत आम्हाला एक पाऊल पुढे जाता येईल. जगातील अग्रेसर असलेल्या ८ शुगर रिफायनरींच्या रुपात आमचे स्थान अधिक मजबूत होईल.

विल्मरच्या साखर उद्योगाचे प्रमुख जीन-ल्यूक बोहबोट यांनी सांगितले की, एमसएएम मलेशियासोबत दीर्घकालीन सहकार्यातून दोन्ही कंपन्यांना ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठ्याची क्षमता विकसित करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here