रियो डी जनेरियो : ब्राझीलच्या रियो डी जनेरियोमध्ये जोरदार पावसानंतर भूस्खलनानंतर जवळपास २३ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने मृतांची संख्या आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो हे सध्या मॉस्कोच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला आहे. मंत्र्यांनी पेट्रोपोलिसमध्ये पूरग्रस्तांना मदत करावी अशा सूचना राष्ट्रपतींनी जारी केल्या आहेत.