नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत २२०.९१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत २०९.११ लाख टन साखर उत्पादन झाले होते. २०२१-२२ मध्ये गाळप सुरू करणाऱ्या ५१६ कारखान्यांपैकी १३ कारखान्यांनी गाळप हंगामाची समाप्ती केली आहे. तर गेल्यावर्षी ४९६ कारखान्यांपैकी ३२ कारखाने या कालावधीपर्यंत बंद झाले होते.
महाराष्ट्रात १९७ साखर कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी या कालावधीत कारखान्यांनी ७५.४६ लाख टन साखर उत्पादीत केली होती. आता यंदा ८६.१५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी गळीत हंगामात सहभागी झालेल्या १८५ कारखान्यांपैकी २ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते. यंदा सर्व कारखाने अद्याप सुरू आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या ११७ कारखाने सुरू आहेत. तर ३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. राज्यात या कारखान्यांनी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ५९.३२ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत १२० कारखान्यांनी ६५.१३ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. गेल्यावर्षी ४ साखर कारखाने १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद झाले होते.
कर्नाटमध्ये १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी ४४.८५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ६६ कारखान्यांनी ३९.०७ लाख टन साखर उत्पादीत केली होती. या हंगामात ७२ कारखान्यांपैकी २ साखर कारखाने १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ६६ कारखान्यांपैकी १७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते.
गुजरातमध्ये १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १५ साखर कारखाने गाळप करीत आहे. त्यांनी ६.९१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी एवढेच कारखाने सुरू होते. त्यांनी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत 6.55 लाख टन साखर उत्पादीत केली होती. तामिळनाडूत २६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३.६० लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या हंगामात याच कालावधीत २५ कारखान्यांनी २.४७ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडीसाने १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सामूहिक रुपात २०.०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तेलंगणामध्ये १ कारखाना, बिहारमध्ये ४, पंजाबमध्ये ३ कारखान्यांनी चालू हंगामात गळीत हंगाम संपवला आहे.
आतापर्यंत जवळपास ५० लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेल्या साखर हंगामात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत भारताकडून जवळपास ३१.५० लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ९.२० लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली होती. याशिवाय फेब्रुवारी २०२२ मध्ये ८ लाख टनापेक्षा अधिक साखरेची निर्यात केली जाणार आहे.
इथेनॉलच्या आघाडीवर, ओएमसींकडून आपल्या चौथ्या टप्प्यात ९५ कोटी लिटरची गरज भासेल. तर पुरवठादारांनी जवळपास ३९ कोटी लिटरच्या पुरवठ्याची स्पष्टता केली आहे. ओएमसींकडून सध्या निविदांची तपासणी सुरू आहे. लवकरच त्यास मंजुरी दिली जाईल. मात्र, आतापर्यंत २१-२२ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी ओएमसींनी पहिल्यांदा विविध स्टॉककडून जवळपास ३८५ कोटी लिटर इथेनॉलला मंजुरी दिली आहे.