रियो डी जनेरियो : ब्राझील मधील रियो डी जनेरियोमध्ये उत्तरेतील पेट्रोपोलिस शहरात जोरदार पाऊस आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनात किमान 94 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
रियो डी जनेरियो राज्य सरकारने पेट्रोपोलिस शहरातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. तसेच अनेक मोटारी वाहून गेल्या. भूस्खलनात जवळपास 94 जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप किती मृतदेह चिखल, गाळात अडकले आहेत हे 17 फेब्रुवारीपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तर पुराच्या संकाटात 54 घरे नष्ट झाली आहेत. यातून 24 जणांना वाचविण्यात आले आहे. तर 35 जण बेपत्ता झाले आहेत. ब्राझीलमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर भूस्खलन आणि पूर आला आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी आपल्या मंत्र्यांना पेट्रोपोलिसमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.