बांगलादेश : सरकारी साखर कारखान्यांकडून दशकात सर्वात कमी साखर उत्पादन

ढाका : सरकारी साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादन गेल्या एक दशकांत सर्वात निच्चांकी स्तरावर येण्याची शक्यता
Bangladesh Sugar and Food Industries Corporationने (BSFIC) व्यक्त केली आहे. कमी ऊस पुरवठ्यामुळे गाळपात गतीने घसरण झाली आहे. सातत्याने तोट्यात चालणारे सहा कारखाने बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना वेळेवर मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते पुरेशा प्रमाणात पिकाची शेती करू शकलेले नाहीत. बीएसएफआयसीचे अध्यक्ष मोहम्मद आरिफूर रहमान अप्पु यांनी सांगितले की, ऊसाच्या कमी पुरवठ्यामुळे साखरेच्या उत्पादनात घसरण झाली आहे.

बीएसएफआयसीच्या आकडेवारीनुसार, उर्वरीत नऊ कारखान्यांकडून चालू आर्थिक वर्षात ४,४२,००० टन ऊसाचे गाळप करून २४,९०० टन साखर उत्पादन करण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४८,१३३ टन साखर उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन ४९ टक्के कमी असेल. त्यांनी सांगितले की, या वर्षी उत्पादन हळूहळू वाढेल. कारण बीएसएफआयसीकडून, बांगलादेश शुगर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूटकडून चांगल्या प्रतीचे बियाणे उरलब्ध करून देण्यात आले आहे. या हंगामात उसाचे जेवढे गाळप झाले आहे, त्यामध्ये ठाकूरगाव शुगर मिल्स लिमिटेडने जवळपास ५० दिवसांत ५७,८०० उसाचे गाळप करुन २८९८ टन साखर उत्पादन केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कंपनीचा उत्पादन स्तर निम्म्यावर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here