विल्लुपूरम : तामीळनाडू कृषी विज्ञान संस्थेच्या संसोधकांच्या पथकाने विल्लूपूरम येथे आर्मीवन किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ऊस पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतर हे संशोधकांचे पथक दाखल झाले आहे. आर्मीवन किडीमुळे जवळपास ३०० एकर क्षेत्रातील ऊसाला फटका बसला आहे. संशोधक पी. श्रीधर, एस. मालती आणि कृषी विभागाने जिल्ह्याचे संयुक्त संचालक जीय रामनन यांनी कनाईकुप्पम गावातील ऊस शेतीची पाहणी केली. आर्मी वन किडीची पाहणी केली. किडी नियंत्रण आणि त्यांना नष्ट करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला.
संशोधक श्रीधर म्हणाले, जेव्हा आपण शेतात किटकनाशकाचा वापर करू, तेव्हाच अशा प्रकारे गतीने पसरणाऱ्या अमेरिकन आर्मी वन किडीला रोखता येईल. ऊस उत्पादक शेतकरी आर्मीवन किडीने हैराण झाले आहेत. यापूर्वी आर्मीवन किड केवळ मक्का, बिन्स, काळे चणे व इतर पिकांवर हल्ला करीत होती. आता तामीळनाडूत पहिल्यांदाच किडीचा उसावर प्रादुर्भाव झाला आहे.
मुंडियाम्बक्कम, ओरथुर, कनई, कनाई कुप्पम, पेरा बक्कम, अयंदुर, आरकोट आणि कंजानूरसह गावातील पिकांवर गेल्या आठवड्यात या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. आर्मीवन किडीने रोप लागणीच्या ३० ते ४० दिवसांत हल्ला केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.